पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता देशाला संबोधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता देशाला संबोधणार असून भारत आणि चीन यांचे संबंध तापले असून त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसेच देशातील कोरोनाचा वाढता आकडा व अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात कोणत्या शिथिलता मिळणार आणि कोणती बंधने अधिक कठोर होणार याची उत्सुकता देखील सर्वांना लागली आहे.

रविवारी मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी लडाखमधील भारत-चीन तणाव, कोरोना यासह विविध विषयांवर भाष्य केलं होतं. भारताला जशी मैत्री निभावता येते, तशीच कुणी वाकडी नजर करुन पाहिल्यास जशास तसे उत्तरही देता येतं. भारताने लडाखमध्ये देशाच्या सीमेचं चोख रक्षण केलं आणि चीनला सडेतोड उत्तर दिलं, असं मोदींनी यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *