१ जुलै पासून ताडोबा पर्यटन होणार सुरू

देशात असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्वच पर्यटन बंद करण्यात आले होते. चंद्रपुरातील ताडोबा पर्यटन सुद्धा १८ मार्चला बंद करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटनावर रोजगार असणाऱ्या गाईड्स, जिप्सी ड्रायव्हर यांच्यावर लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची वेळ आली होती.

आता मात्र १ जुलै पासून ताडोबामध्ये पर्यटनाला सुरवात होत असल्यामुळे ताडोबाच्या पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ जुलैपासून ताडोबामध्ये पुन्हा पर्यटनाला सुरुवात होणार असून बफर क्षेत्रातील १३ प्रवेशद्वारातून पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. प्रत्येक गेटमधून सकाळी आणि दुपारी सोडणार ६-६ जिप्सी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा पर्यटकांना  ताडोबातील वाघांना पाहता येणार आहे. तसेच ताडोबाची सफारी करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *