गडचांदुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील सौंदर्यीकरणाचे काम त्वरित सुरु करा. नगरसेवक अरविंद डोहे यांची मागणी

गडचांदुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौंदर्यीकरणाचे काम काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे हे काम त्वरित काम करावे अशी मागणी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून त्यांच्या गडचांदुर येथील पुतळ्याच्या परिसरातील सौंदर्यीकरण करण्याकरिता नगरपरिषदेच्या मागील कार्यकाळात सदर चौकाचे व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ठराव घेऊन तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली होती. निविदा मागवून काम सुद्धा देण्यात आले होते. परंतु वेळीच नगरपरिषदेची निवडणूक लागल्याने सदर काम होऊ शकले नाही. निवडणूक होऊन बराच कालावधी झाला असून अजूनही या कामाला सुरवात करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काम चालू करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *