कृषिमंत्र्यांनीच केली खताच्या काळ्याबाजाराची पोलखोल, शेतकरी बनून केले स्टिंग ऑपरेशन

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणत खतांचा तुटवळा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांची निर्मिती झाली नाही. त्यामुळे याचे परिणाम शेतकऱ्यांवर होत असून बाजारात खतांचा तुटवळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हंगाम चालू असून त्यातच खतांचा तुटवळा जाणवत आहे. बाजारात युरिया खतांचा तुटवळा तर खूप मोठ्या प्रमाणात असून कृषि केंद्र धारक इतर खत घेतल्याशिवाय युरिया देण्यास नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचंनींना सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत कृषीमंत्र्यांनी औरंगाबादला अचानक भेट दिली. यानंतर जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानात गेल्यानंतर दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. मात्र त्या दुकानदाराने युरिया शिल्लक नाही असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केली, मात्र तरीही त्या दुकानदाराने युरिया नसल्याचे सांगितले. यानंतर कृषीमंत्र्यांनी दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर युरीया शिल्लक असल्याचं दुकानदाराच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्याच्याकडे स्टॉक रजिस्टरची मागणी केली. तेव्हा त्या दुकानदाराने ते घरी असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तर दिली.

त्यानंतर कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही, यावर दादाजी भुसेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कृषिमंत्र्यांकडून दुकानदारांना इशारा

या प्रकाराने संतापलेल्या कृषीमंत्र्यांनी औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्याच दुकानातून कृषी विभागाच्या सचिवांना फोन करत यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या. राज्यभरातील कृषी मालाच्या दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करु नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही कृषीमंत्र्यांनी दिला आहे.

One Comment on “कृषिमंत्र्यांनीच केली खताच्या काळ्याबाजाराची पोलखोल, शेतकरी बनून केले स्टिंग ऑपरेशन”

  1. मंत्री दादा भुसे यांनी अतिशय छान काम केले स्टिंग ऑपरेशन बऱ्याच तक्रारी असतात अधिकारी दुर्लक्ष करतात पण मंत्री महोदय यांनी स्वता दखल घेऊन हे ऑपरेशन केले पण योग्य वाटल्यास त्याचे लायसन्स रद्द करण्यात यावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *