राष्ट्रवादीची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली लवकरच जाणार विधानपरिषदेवर.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कडून विधानपरिषदेचे ऑफर देण्यात आली होती. यासाठी राज्यातील मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधान परिषद देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र स्वतः राजू शेट्टी यांनी आमदारकी घ्यावी यासाठी शरद पवार आग्रही होते. त्यामुळे आता राजू शेट्टी हे विधानपरिषदेसाठी तयार झाले असून त्यांनी विधानपरिषदेचे ऑफर स्वीकारल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

राज्यपाल यांच्याकडून विधानपरिषदेसाठी नवीन सदस्य निवडले जाणार असून यामध्ये आता राजू शेट्टी यांचा समावेश होणार आहे. याबाबत अजून राजू शेट्टी यांनी अधिकृत माहिती दिली नसून लवकरच याबाबत माहिती देणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. आज राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असून याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *