सकारात्मक…..! गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण रुग्ण कोरोनामुक्त.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. जगातील अनेक देश कोरोनामुळे त्रस्त आहे. मात्र याच पार्श्वभुमिवर दिलासा देणाऱ्या अनेक बातम्या येत आहे. राज्यातील गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. आज कोरोना हारला आणि गोंदिया जिंकला. तरीही यापुढे कोरोनाची कोणालाही बाधा होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित सर्व ६९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज १० जून रोजी जिल्ह्यातील शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. हा रुग्ण अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हा प्रशासनाने केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना व सर्व यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे झाले असून सध्या तरी गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *