आनंदवार्ता…! मान्सून राज्यात दाखल, बळीराजा आनंदात

मागील काही दिवसांपासून मान्सून राज्यात दाखल होण्याचे अंदाज वर्तविण्यात येत होते. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून कधी दाखल होणार याची चिंता राज्यातील शेतकर्‍यांना लागली होती. उशीरा का होईना राज्यात आज म्हणजे ११ जूनला मान्सून दाखल झाला आहे. याबाबतची घोषणा हवामान खात्याने केली आहे.
         मान्सूनने हर्नाई, सोलापूर, रंगुंडण असा प्रवास चालू केला असून पुढील ४८ तासांत मोठा भाग व्यापणार असून या काळात मुसळधार सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली होती. परंतु मान्सून लवकरच राज्यात येईल अशी माहिती हवामान विभाणे दिली होती. राज्यात गेल्या दोन तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरी बरसल्या होत्या. त्यामुळे राज्यातील तापमान कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक तापमान ४१.५ अंश सेलियस असून या तापमानाची नोंद चंद्रपू येथे झाली आहे.  राज्यात टप्याटप्यात मान्सून सक्रिय होणार असून उद्या जास्त सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा

तीन महिन्यांत पाच बळी घेणारा चंद्रपुरातील केटी-१ वाघ अखेर जेरबंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *