तीन महिन्यांत पाच बळी घेणारा चंद्रपुरातील केटी-१ वाघ अखेर जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घालणारा वाघ अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून जेरबंद करण्यात आला आहे. या वाघाने चिमूर परीसरात प्रचंड दहशद निर्माण केली होती असून याने ३ महिन्यात ५ लोकांचा बळी घेतला. कोलारा गावाजवळच्या जुना कोलारा गेट परिसरातून या वाघाला पकडण्यात आलं. वाघाला नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलवले जाण्याची शक्यता आहे.

वन विभागाकडून अधिकाऱ्यांनी या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्याकडे मागितली. त्यानंतर लगेच पथके स्थापन करुन या वाघाला जेरबंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. या भागातील पाचवा बळी गेलेल्या ठिकाणी पिंजरे लावून वाघाला बेशुद्ध करण्यासाठी पथक सज्ज झाले त्यानंतर आज संध्याकाळी याठिकाणी वाघ येताच बेशुद्धीचे इंजेक्शन मारुन त्याला जेरबंद करण्यात आलं.

या वाघाने ५ ग्रामस्थांसह जवळपास २४ पाळीव प्राण्यांना आपले केले होते. या वाघाला जेरबंद केल्याने वाघाची दहशद असलेल्या परिसरातील नागरिकांची भीती दूर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *