५ वर्षात ५ कोटी रोजगार देणार मोदी सरकार ; नितिन गडकरींचा विश्वास

देशावर सध्या कोरोनाचे संकट आलेले असून याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. किंबहुना बहुतेक लोकांच्या नोकर्याि देखील गेल्या आहे. त्यातच केद्रियमंत्री नितिन गडकरी यांनी ५ वर्षात ५ कोटी नोकर्याआ देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

“एमएसएमईचं अर्थव्यवस्थेत मोठ योगदान आहे, परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे या क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. केंद्र सरकारकडून सर्व क्षेत्रांना उभारी देण्याकरिता २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यापैकी तीन लाख कोटींचा फायदा एमएसएमई क्षेत्राला होणार आहे.” अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे.

“करोनामुळे नक्कीच एमएसएमई क्षेत्रासोबतच संपूर्ण उद्योग क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु याची एक सकारात्मक बाजू आहे,” असंही गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी पीपीई किट्सवरही भाष्य केलं. “दोन महिन्यांपूर्वी आपण पीपीई किट्सचं उत्पादन करत नव्हतो. आपण चीनमधून पीपीई किट्स मागवले होते. परंतु आता देशात एका दिवसांत ३ लाख पीपीई किट्सचं उत्पादन करण्यात येत आहे. आता पीपीई किट्सच्या निर्यातीचा विचार सुरू आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

आता केंद्र सरकार निर्यातीवर भर देणार असून भारत आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करत असून कमी आयात आणि जास्त निर्यात करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच निर्यातीला प्रोत्साहन देणार असून कोरोणाच्या काळात कोन्हीही निराश होऊ नये सकारात्मक विचारांना आपल्याला समोर न्यायला हवे असे प्रतिपादन नितिन गडकरी यांनी केले.

हेही वाचा

चंद्रपूरकरांना मोठा धक्का..! आज एका दिवशी ११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *