येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्र सक्रिय होण्याची शक्यता.

राज्यातील तापमान सरासरी तापमानाच्या ३ ते ४ अंश सेल्सीअसने कमी झाले असून बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे आता थांबलेला मान्सून आणखी वेगाने पूर्वेकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत महाराष्ट्रात काही भागांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निसर्ग चंक्रीवादळामुळे ४ जूनला मान्सूनचा थांबला होता. मात्र आता बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात मान्सूनच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. ८ जूनला बंगालच्या खाडीत मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. हे क्षेत्र पश्चिम व उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकणार. ९ जूनला ओडिशाच्या किनारि मोठ्या घडामोडी घडून १० जून रोजी महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, येथील ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शेतकर्‍यांसाठी नवीन हंगाम चालू होत असून मशागतीची कामे जोरात चालू असून मान्सूनची चाहूल लागल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा

भारताची मोठी कामगिरी सर्वात स्वस्त आणि जलद कोरोना किट केली तयार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *