बिग न्यूज…! चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुर येथे आढळला नवीन कोरोना रुग्ण.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज आलेल्या माहिती नुसार आज चंद्रपूर मधील गडचांदूर येथे आज नवीन रुग्ण मिळाला आहे. सदर रुग्ण हा दिल्लीवरून आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर रुग्णाचे ४ तारखेला स्वॅप घेण्यात आले असून आज त्याचा रिपोर्ट पोझीटीव्ह आला असल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता २९ वर पोहचली आहे. सध्या युवक वास्तव्य करत असलेला परिसर सिल करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. कोरपना तालुक्यात मिळालेला हा पहिला रुग्ण आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *