चंद्रपूरकरांना मोठा धक्का..! आज एका दिवशी ११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद.

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी चंद्रपुरातील कोरोनाचा आकडा कमी होत होता. मात्र आज आलेल्या रिपोर्ट नुसार आज चंद्रपुरात नवीन ११ रुग्ण आढळले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ३९ झाली आहे.

यामध्ये मुंबईवरून आलेला शास्त्री नगर चंद्रपूर येथील ३१ वर्षाच्या पुरुष ,नवी दिल्लीवरून गडचांदूर येथील २७ वर्षाचा व्यक्ती, जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ३६ वर्षाचा व्यक्ती, यवतमाळ वरून आलेला नागभीड तालुक्यातील पूनघाडा रिठ या गावचा ३६ वर्षीय व्यक्ती, ओडीसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावचा चाळीस वर्षीय पुरुष, तसेच यवतमाळ येथून आलेला नागभिड शहरातील ४५ वर्षाचा पुरुष, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्ती सह ब्रह्मपुरी येथील कोविड -१९ केअर सेंटर मधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण पाच व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी अडयाळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य ३ नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला ४३ वर्षाचा व २७ वर्षाचा पुरूष आहे.तर गुजरात मधून आलेला पुंड सावली येथील एक व्यक्ती आहे.

नव्याने आढळून आलेले रुग्णांमध्ये बाहेरून आलेले रुग्ण आहे. लॉकडाऊन चे निर्बंध शिथिल केल्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊन शिथिल केल्याने भारतात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होईल असा इशारा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *