अबब..! टकलुंना कोरोनाचा जास्त धोका, संशोधकांचा दावा.

संपूर्ण जगात कहर चालू असलेल्या कोरोनाबाबत संशोधकांनी नवीन निष्कर्ष काढला आहे. अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठातील संशोधक कार्लोस बॉम्बीअर यांच्या म्हणण्यानुसार पुरुषांमध्येही जे टकलू आहेत त्यांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी कोरोंनाचे संक्रमण महिलांच्या तुलनेत पुरूषांना जास्त होत असल्याचे सिद्ध झाले होते.

अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी मध्ये १२२ पुरुषांवर संशोधन केले गेले त्यात लागण झालेल्या पुरुषात टकलू पुरुष ७९ टक्के होते असे दिसून आले. यामागे असे कारण दिले जात आहे, पुरुषांमधील सेक्स हार्मोन अँड्रोजेन दिल्या गेलेल्या औषधाचा परिणाम कमी करते म्हणजेच करोना संक्रमणाची शक्यता वाढते. परिणामी रुग्ण बरा होण्यास अधिक वेळ लागतो. हे हार्मोन पेशींतील संक्रमणाचे प्रवेशद्वार ठरू शकते. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये लागण अधिक दिसण्याची अन्य कारणेही आहेत. त्यात धुम्रपान, महिलांची इम्युनिटी जास्त ताकदीची असणे, मधुमेही आणि रक्तदाबाचे पुरुष रुग्ण अधिक प्रमाणात असणे आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांचे हात धुण्याचे प्रमाण कमी असणे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता जे लोकं टकलू आहे. त्यांना आता स्वत:ची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. 

हेही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *