राज्यपालांनी दिल्या ‘या’ विद्यापीठांच्या सर्व परीक्षा घेण्यास मंजूरी.

राज्यातील कोरोंनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील बहुतांशपरीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे कौतूक केले.

अमित देशमुख यांनी परीक्षा घेण्यासाठी तीन पर्याय तयार केले आहे. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील. कोरोना परिस्थितीमुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल. उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परिक्षांचा आराखडा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी, माजी कुलगुरु, प्रकुलगुरुंशी तसेच नियामक संस्थांशी विचारविनिमय केल्याचे अमित देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले.

हेही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *