मोठी बातमी…! महाविकास आघाडी सरकार करणार राज्यपालाच्या बदलीची पंतप्रधानांकडे मागणी.

राज्यातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील नेहमीच दुफळी दिसून आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राज्यात राज्यपाल यांच्या विरुद्ध ठाकरे सरकार प्रचंड असंतोष असल्याचे दिसून आले होते. त्यातच आता ठाकरे सरकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बदलविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार असल्याचे समोर येत आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांच्या निर्णयाला विरोध करणार्या  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली करावी यासाठी ठाकरे सरकार मागणी करणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असल्याचे समोर येत आहे.
महाविकास आघाडीने थेट सरपंच व बाजार समितीत शेतकर्यांयना मतदानाचा अधिकार यासंबंधी निर्णय घेतले व त्या अध्यादेशावर अंतिम स्वाक्षरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविले. मात्र त्यांनी जाणीवपूर्ण उशीर लावल्याचे महाविकास आघाडी कडून सांगण्यात येत आहे. तसेच मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला राज्यपाल विरोध करत असतात. आताच सरकारने घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला परंतु त्यालाही राज्यपालांनी विरोध केला. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार त्यांना बदलविण्यासाठी पंतप्रधानांकडे जाणार असल्याचे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी संगितले आहे.

हेही वाचा

आर्थिक संकटामुळे मोदी सरकारचा नवीन सरकारी योजनांना ‘ब्रेक’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *