गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर, धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट्स, कार्यालये होणार ८ जून पासून सुरु.

कोरोना व्हायरस च्या पार्श्व भूमीवर घोषित करण्यास आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्यात शिथिलता करण्यास सूरवा त होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून येत्या ८ जून पासून केंद्रीय गृहमंत्रालयाने धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि हॉस्पिटॅलिटी सर्विसशी संबंधित ठिकाणं, शॉपिंग मॉल उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यासाठी सर्वांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं  तंतोतंत पालन करावं लागणार आहे.

गृह मंत्रालयाच्या नवीन नियमावलीनुसार इमारतीत १ किंवा २ कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ४८ तासांसाठी लॉक होणार नाही. याऐवजी संबंधित कोरोना रुग्ण जेथे राहत होता त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण केलं जाईल. गृह मंत्रालयाने म्हटलं आहे, “कोणत्याही ऑफिस किंवा राहण्याच्या ठिकाणी रुग्ण आढळल्यास त्या इमारती ऐवजी केवळ इमारतीचा तो भाग निर्जंतुकीकरणासाठी लॉक करण्यात येईल. त्या दरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *