आर्थिक संकटामुळे मोदी सरकारचा नवीन सरकारी योजनांना ‘ब्रेक’

कोरोनामुळे देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे देशातील आर्थिक स्थिति पूर्वरत आणण्यासाठी सरकार कडू अनेक प्रयत्न केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत कोणतीही नवीन सरकारी योजना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारताशी संबंधित योजनांना हे निर्बंध लागू होणार नाही.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे सुरू असलेल्या आर्थिक संकटात केंद्र सरकारकडून कॉस्ट कटिंग उपाय अंतर्गत निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या घोषणांचा खर्च सुरूच राहील. नवीन कोणतीही योजना चालू होत नसली तरी चालू वर्षात मंजूर झालेल्या व मूल्यांकन केलेल्या सर्व योजना लागू होणार आहे. असे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा

राज्यपालांनी दिल्या ‘या’ विद्यापीठांच्या सर्व पाइक्षा घेण्यास मंजूरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *