सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात.

राज्यातील काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना २५ मेला कोरोनाची लागण झाली होती. त्यासाठी त्यांना मुंबईला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. अखेर आठवळ्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांच्या अगोदर जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांना नांदेड येथे असताना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेने नांदेड वरून मुंबईला आणण्यात आले होते. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले गेले होते. अखेर त्यांनी यशस्वी रित्या कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *