जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथे गॅस सिलेंडरचा स्पोट झालेल्या घराची मा.आमदार अँड संजय धोटे यांनी भेट देऊन केली पाहणी

जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथील नारायण पवार यांच्या घरी काल दिनांक ३ जूनला रोजी अचानक पणे गॅस सिलेंडरचा स्पोट झाला यात घराचे तसेच घरातील सामन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,तसेच एक मोटर सायकल व आटोचे नुकसान झाले,या घटनेची माहिती मिळताच राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी तुरंत घटनास्थळी धाव घेतली व घराची पाहणी केली,यावेळी नुकसान झालेल्या घरातील सामान तसेच इतर वस्तू आगीत जळून खाक झाली

यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी आगीत घर जळालेले व्यक्ती श्री नारायण पवार यांना शासना तर्फे नुकसानभरपाई देण्याची यावेळी मागणी केली, माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सोबत संजय गांधी निराधार योजने चे अध्यक्ष सुरेश केंद्रे सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *