शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त सहयाद्री प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे रक्तदान शिबीर.

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सहयाद्री प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास समोर यावे आहे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यामध्ये  रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.  त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून रक्तदान करण्यासाठी आव्हान केले जात आहे. कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळेच याचे गांभीर्य लक्षात घेता सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्या वतीने ६ जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

कोरोना संकटाच्या काळात आपले सामाजिक ऋण फेडण्याची हीच वेळ असून नागरिकांनी रक्तदान करून आपले ऋण फेडावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान चे चंद्रपूर शहर अध्यक्ष प्रज्वल गर्गेलवार व उपाध्यक्ष श्याम बोबडे यांनी केले आहे.

रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास खालील ठिकाणी यावे
स्थळ :- स्टूडेंट केअर इन्स्टीट्युड
जैन भवन समोर पठानपुरा रोड, चंद्रपूर
वेळ :- सकाळी १० वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *