चंद्रपूर जिल्ह्याची पुन्हा ग्रीन झोन कडे वाटचाल.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात मोठ्या  प्रमाणात होत असला तरी राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सुरवातीला ग्रीन झोन असलेला चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे २३ रुग्ण आढळून आले होते.

परंतु चंद्रपूर जिल्‍ह्यातील रुग्ण कोरूना मुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यंत  चंद्रपूर जिल्ह्यातील १३ रुग्ण अगोदर कोरोनामुक्त झाले होते. त्यातच आज नवीन ७ रुग्ण कोरोणामुक्त झाल्याने चंद्रपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ३ अॅक्टिव रुग्ण आहे.  जिल्ह्यातील १०१३ लोकांचे स्वॅप नमुने घेण्यात आले असून त्यातील ९०६ नमुने निगेटिव्ह आले असून ७३ नमुन्यांचे अहवाल अजून प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील सर्व पोझीटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *