गोंडपिपरी येथील रक्तदान शिबिरात ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यामध्ये  रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.  त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून रक्तदान करण्यासाठी आव्हान केले जात आहे. कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे याचे गांभिर्य लक्षात घेत जनता महाविद्यालय,गोंडपिपरी येथे जय माता दी क्रीड़ा मंडळानी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात गोंडपीपरी तालुक्यातील महिला व पुरुष अशा सर्व मिळून ८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

मा. नगरसेवक चेतन भाऊ गौर यांनी या शिबिराला खुप मदत आणि विशेष सहकार्य केले असून जय माता दी क्रीड़ा मंडळानी त्यांचे विशेष आभार मानले. या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी जय माता दी क्रीड़ा मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *