धक्कादायक….! जगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणीतील १६४ कामगारांना कोरोनाची लागण.

चीनमधील वुहान शहरातून प्रसारित झालेला कोरोना आता जमिनीच्या खाली सुद्धा पोहचला आहे. जगातील २०० देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून कोरोनाच्या संसर्गापासून जगातील सर्वात खोल सोन्याची खाणदेखील वाचू शकली नाही. या खाणीत काम करणाऱ्या कामगारांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोनेन्ग सोन्याच्या खाणीतील कामगारांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या खाणीतील काम अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आले आहे. एंग्लोगोल्ड अशांती या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात एकाला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ६५० कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १६४ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. करोनाची बाधा झालेल्यांपैकी अनेकांमध्ये लक्षण दिसून आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

ही खान जगातील सर्वात खोल खान असून पृथ्वीपासून चार किमी अंतरावर ही खाण आहे. जगातील सर्वात खोल खाण म्हणून या खाणीची ओळख आहे. या खाणीतील सोने काढण्याचे हक्क अँग्लोगोल्ड आशांती कंपनीला देण्यात आले आहेत.  त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार जमिनीपुरताच मर्यादित राहिला नसून तो आता जमिनीखाली देखील पोहचला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र घेणार केरळची मदत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *