चंद्रपुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, काल चार नव्या रुग्णांचा नोंद.

सुरुवातीच्या काळात कोरोनापासून दूर राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात काल नवीन चार रुग्णांची नोंद झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मध्यरात्री नंतर वाढून १९ झाली आहे.
चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे च्या रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुण्यावरून आलेल्या २८ वर्षीय दुर्गापूर येथील युवक होम कॉरेन्टाइन होता. २१ ला लक्षणे दिसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाला होता. २२ मे रोजी या युवकाचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. नाशिक मालेगाव येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील मूल तालुक्यातील चिरोली येथील २७ वर्षीय व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या युवकाचा स्वब नमुना २२ मे रोजी घेण्यात आला होता. घुगुस येथील पंचवीस वर्षीय महिला १४ मे रोजी पुण्यावरून आली होती. ती होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे दिसून आल्यामुळे २२ मे रोजी वैद्यकीय महाविद्यालय  रुग्णालयात दाखल झाली.  मुंबईवरून आलेला मौजा वरवट येथील पंचवीस वर्षाच्या युवकांचा समावेश आहे. हा युवक १७ मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. 
या चारही व्यक्तींचे रिपोर्ट पोझीटीव्ह आले असून चंद्रपुरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १९ वर पोहचली आहे. यातील पहिला कोरोनारुग्न कोरोनामुक्त. झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *