कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजुरा येथे पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क वितरण.

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी घरी रहा सुरक्षित रहा या शासनाच्या सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. कारण देशातील कोरोनाचं संकट वाढत आहे. या वाढत्या संकटात देखील आपल्या  सर्वांची सुरक्षा करण्याचे काम सध्या पोलिस प्रशासन करत आहे. त्यामुळे त्यांच्यात सुरक्षेतेसाठी माझी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या संकल्पनेतून राजुरा येथील पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

पोलिस प्रशासन हे आपले कर्तव्य उत्तम पर पडत असून त्यांच्या सुरेक्षेसाठी राजुरा येथील अरूनजी मस्की व सचिन डोहे यांच्या पुढाकारातून मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ठाणेदार नरेंद्रजी कोसुरक यांच्या उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. तसेच राजुरा येथील मंगेश श्रीरामे, गणेश रेकलवार, आदित्य भाके, मोहन कलेगुलवार, योगेश येरणे, आकाश गंधारे, आदी उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *