ब्रेकिंग न्यूज….! चंद्रपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, नऊ नवीन रुग्ण आढळले.

चंद्रपूरकरांची चिंता वाढली आहे. कारण चंद्रपुरातील कोरोना बाधितांची संख्या आज नऊ ने वाढल्याचे वृत्त हातात येत आहे. आज सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात ९ नवीन रुग्ण सापडले. हे सर्व रुग्ण चंद्रपुरातील क्वारंटीन सेंटरमध्ये दाखल होते असून त्यांचा आज अहवाल पोझीटीव्ह आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे ९ रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. यापैकी ५ जण वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर ४ जण वन अकादमीच्या नव्या इमारतीत संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

चंद्रपूरकरांचा धोका आता वाढला असून चंद्रपूरकरांनी आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्व नागरिक बाहेरून आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *