कौतुकास्पद…! होम क्वारंटाईन शिवसेनेच्या खासदाराने दिले स्वत:चे घर.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्याला कोरोनाचे सौम्य लक्षण आहे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. तर जे लोकं बाहेरून प्रवासातून येत आहे त्यांना शासकीय ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार धैयाशिल माने यांनी आपले स्वत:चे घर होम क्वारंटाईन साथी दिले आहे. होम क्वारंटाइनसाठी स्वतःचं घर देणारे धैर्यशील माने हे देशातील एकमेव खासदार म्हणावे लागतील. त्यामुळे अलगीकरणाच्या नव्या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवातच त्यांनी केली आहे.

खासदार धैर्यशील माने यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागरिकांना एक आवाहन केलं होतं. एखादा व्यक्ती परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत असेल तर त्याला संबंधित ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येते. मात्र त्यांचा निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना आता त्यांच्या घरी जायची सोय केली जाणार आहे. संबंधित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीची घरीच सोय करण्यात येणार आहे. मात्र घरातील सदस्यांनी मात्र आपल्या भावकीत किंवा शेजाऱ्यांच्यात काही दिवस राहण्यासाठी जावे, असे आवाहन केले होते. आवाहन केल्यानंतर त्यांनी सुरुवात स्वतःपासूनच केली आहे. त्यांच्या अभिनव अशा कल्पनेनंतर प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *