लॉकडाऊन ४ साठी राज्य शासनाकडून नियमावली जाहीर.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन ४ साठी राज्यसरकारने नियमावली जाहीर केली आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉक डाऊन मध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. रेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली नियमावली

संध्याकाळी सात ते सकाळी सात सर्व सेवा बंद राहणार. अत्यावश्यक सोडता संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बाहेर फिरण्यास मज्जाव.

६५ वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती, १०वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावे, वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडावे.

राज्यातील जिल्ह्यांची रेड झोन व बिगर रेड झोन अशी विभागणी करण्यात आली आहे. 

रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिकांचा समावेश रेड झोन मध्ये करण्यात आला आहे. तर उरलेल्या क्षेत्रांचा बिगर रेड झोन मध्ये समावेश करण्यात आला आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून  केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होणार आहे.

रेड झोन मध्ये सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर दुकानांबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यास  रेड झोन मध्ये दारूची दुकाने उघडता येणार असून दारू होम डिलव्हरी करता येणार आहे. टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार असून चार चाकीमध्ये १+२ तर टू व्हीलर वर केवळ एकालाच परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी असेल तर दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी असेल.

बिगर रेड झोन मधील नियमावली 

सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी राहणार आहे. आंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *