भारत खूप चांगला देश,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रंप यांच्याकडून भारताचे कौतुक.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रंप यांनी आज सकाळी झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत भारतावर स्तुतिसुमने उधळली. भारत हा चांगला देश असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचे  त्यांनी यावेळी म्हटले.

आम्ही भारतसोबत काम करत आहोत, अमेरिकेत भारतातील अनेक लोक वास्तव्य करतात. कोरोनाच्या महामारीत अनेक भारतीय थोर वैज्ञानिक आणि संशोधक कोरोनाची लस काढण्यासाठी आमच्यासोबत काम करत आहे. असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो असून आमच्याकडे व्हेंटिलेटरचा मोठा साठा आहे त्यामुळे आम्ही भारतासाठी बरेच व्हेंटिलेटर पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *