जय माता दी क्रीडा मंडळ गोंडपिपरी यांच्याकडून रक्तदान करण्याचे आवाहन.

कोरोनामुळे संपूर्ण राज्यातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवळा भासत असून रक्तदान करण्याचे आवाहन विविध स्तरावरून केले जात आहे. कोरोनामुळे रक्तदाते रक्तदान करायला बाहेर जात नसल्याने रक्ताचा तुटवळा निर्माण होत आहे. जय माता दी क्रीडा मंडळ  गोंडपिपरी यांच्या वतीने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यांच्या मार्फत येत्या २५/०५/२०२० ला गोंडपिपरी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. जय माता दी क्रीडा मंडळ  गोंडपिपरी आपल्या क्रीडा क्षेत्रासोबतच नेहमी सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देत असते. त्यामुळे त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

रक्तदान शिबीर दिनांक : २५/०५/२०२०
वेळ :- सकाळी १० ते २
स्थळ :- जनता महाविद्यालय गोंडपिपरी.

रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास खालील व्यक्तींना संपर्क करावा
रोहित पुन्यप्रेड्डीवार :- ९५१८५७२८१०
सोहिल नगारे :- ९८३४९२२२४०
चेतन यशवंतवार :- ९६६५२५३५६१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *