आरोग्य विभागात होणार बंपर भरती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

राज्यातील कोरोंनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येणार्यात काळात राज्याला मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचार्‍याची  गरज भासणार आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य विभागात मोठी भरती घेण्यात येणार आहे. असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात आरोग्यविभागातील जागा रिक्त आहे. तसेच पालिकांच्या रुग्णालयात हजारो जागा रिक्त आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यात आरोग्य विभागातील जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नसून त्यांच्या गुणांच्या आधारावर ही भरती घेण्यात येणारा आहे. सध्या राज्यात जे कर्मचारी उपलब्ध आहे. ते कोरोनाच्या प्रादुर्भावने प्रचंड काम करत आहे. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळण्यासाठी ही भरती लवकर घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

सध्या राज्यात काम करणारे आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मेहनत घेत आहे. आपले कर्तव्य पार करतांना त्यांना अनेक समस्या येत असल्यातरी त्या समस्यांवर मात करत ते आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे राज्यात ही भरती झाल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *