संकट घेऊन आले संधी, परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात परतल्याने भूमिपुत्रांना मिळणार नोकरीची संधी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बेरोजगार असणाऱ्या तरुणांना एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक परप्रांतीय कामगार आप आपल्या गावाला परतले आहे त्यामुळे आता भूमिपुत्रांना महाराष्ट्रात अनेक नोकरीच्या संधी मिळणार असून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्युरोची स्थापना करणार आहे.

राज्यातील उद्योग, कामगार आणि कौशल्य विभागातर्फे कामगार ब्युरोची स्थापना होणार असून या कामगार ब्यूरो मध्ये नोंदणी करणाऱ्या कामगारांची कुशल अकुशल अशी विभागणी करून त्यांना त्यासंबंधी प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यावर सध्या संकटाचे सावट असले तरी मात्र हे संकट संधी घेऊन आले आहे. कोरोनामुळे अनेक परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात गेल्याने कोरोना संकट गेल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध मिळणार आहे . त्यामुळे याचा लाभ भूमिपुत्रांना व्हावा यासाठी सरकार देखील पुढे सरसावले आहे. आता नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी तरुणांनी देखील पुढे येण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *