स्मार्ट बिबी चे स्मार्ट काम लोकवर्गणीतून २०० गरीब कुटुंबांना धान्याची मदत.

कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील ग्रामस्थांनी गरीब लोकांच्या लोकवर्गणी गोळा केली असून त्यातून २०० गरीब कुटुंबांना धान्य व किराणा पुरविण्यात आला आहे.

ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांना शासनाकडून अजूनपर्यंत मदत पोहचली नाही. त्याची वाट न पाहता ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांना व्हाट्सअपच्या माध्यमातून आवाहन केले. त्यानंतर लोकांनी प्रतिसाद देत दोन- तीन दिवसात १ लाख रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. त्या वर्गणीतून २०० कुटुंबांना ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, १ किलो तेल, १ किलो तूरडाळ, मीठ, तिखट व हळद इत्यादी साहित्य दिले. वेगवेगळ्या उपक्रमात प्रामुख्याने सहभागी होणाऱ्या बिबी ग्रामस्थांनी कोरोनातही लोकसहभाग दर्शवून मदत गोळा केल्याने ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
       
आमचा गाव औद्योगिक परिसर असल्याने बाहेरील अनेक लोक कामानिमित्त येथे वास्तव्यास आहे. मूळगावी त्यांचे रेशन कार्ड असल्याने येथे त्यांना धान्य मिळत नाही. अशा गरजू कुटुंबांची आम्ही यादी बनवली आणि त्यांच्यापर्यंत धान्य पोहचवले. गावातील लोकसहभागामुळे हे शक्य झाले.

– प्रा. आशिष देरकर
उपसरपंच, ग्रा. पं. बिबी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *