माझी नगराध्यक्ष शोभा तडस यांनी स्वतः बनविलेले मास्क केले वाटप.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मास्क लावण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाहेर पडतांना सर्वांनी मास्क लाऊन व हाताला सॅनिटराईझर लावून निघावे अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे सामाजिक काम करणाऱ्या वर्ध्यातील देवळी नगरपरिषद माझी नगराध्यक्ष शोभा तडस यांनी स्वतः बनविलेले मास्क बनवून त्याचे मोफत वाटप केले आहे. त्यांनी भाजी बाजारातील भाजी विक्रेत्यांनी या मास्कचं वाटप केलं आहे. शोभा तडस या नेहमी सामाजिक कामात अग्रेसर राहत असतात. त्या वर्धा जिल्ह्याचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या पत्नी आहे. त्यांनी स्वतः आपल्या घरी मास्क बनवून त्याचे मोफत वाटप केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *