गर्दी टाळण्यासाठी राज्यात आता ई-टोकन द्वारे मिळणार दारू.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता मात्र राज्य सरकारने राज्याच्या महसूल वाढविण्यासाठी दारू चालू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दारू घेण्यासाठी तळीरामांनी प्रचंड गर्दी केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई टोकन सुविधा उपलब्ध केली आहे.

यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात आले असून ग्राहकांना त्या संकेतस्थळावर जाऊन दारूसाठी नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी केल्यानंतर त्यांना ई- टोकण मिळेल. www.mahaexcise.com या संकेतस्थळाद्वारे दारुसाठी नोंदणी करायची आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. नोंदणी करतांना ग्राहकांना आपला मोबाईल नंबर नाव जिल्हा पिन कोड टाकायचा असून त्यानंतर सबमिट बटण क्लिक केल्यानंतर ग्राहकाला त्याच्या जवळील वाइन शॉपची यादी दिसणार असून त्याला वाटेल त्या वाइन शॉप ची निवड करायची आहे. त्यानंतर त्याला ई- टोकण मिळणार आहे. त्यानंतर तो आपल्या सोयीनुसार वाइन शॉप मध्ये जाऊन रांगेत न लागता दारू घेऊ शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *