संगणक क्लासेस, झेरॉक्स डीटीपी सेंटर चालू करण्यास परवानगी द्या.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वात संगणक क्लासेस झेरॉक्स डीटीपी बंद होते राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील साडे तीन हजार संस्था बंद ठेऊन ठेवण्यात आल्या होत्या. संगणक क्लासेस झेरॉक्स इत्यादी वस्तू या इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे याचा जास्त काळ उपयोग झाला नाही तर या वस्तू खराब होऊ शकतात. त्यामुळे संगणक क्लासेस झेरॉक्स डीटीपी सेंटर ला परवानगी द्यावी अशी मागणी टंकलेखन संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी होऊ नये म्हणून शासनाचा निर्णय आम्ही पाळला मात्र आता राज्यातील काही संगणक क्लासेस व डीटीपी सेंटर चालकांवर आर्थिक संकट येत आहे त्यामुळे आमची गणना माध्यमांत शिक्षणात न करता आम्हाला आमचे सेंटर चालू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेकडून होत आहे. माध्यमांत शाळांना अनुदान मिळते, तसेच तिथे काम करणाऱ्यांना सरकार वेतन देते मात्र संगणक क्लासेस व डीटीपी सेंटर चालकांना अशी सुविधा त्यामुळे राज्यातील सरकारने संगणक क्लासेस व  डीटीपी चालकांना परवानगी द्यावी अशी मागणी टंकलेखन संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *