मोठी बातमी….! पहिली ते सहावीपर्यंत आता मराठी सक्ती.

महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला असून पुढील सत्रापासून म्हणजेच 2020-21 पासून पहिली ते सहावीपर्यंत मराठी भाषेची सक्ती असणार आहे. आता पहिली ते सहावी पर्यंत सर्वच शाळेत आता मराठी भाषा शिकविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु होईल, असं मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं होतं. आता त्याच्याच अनुषंगाने होत असलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला.

आगामी शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी मराठी भाषेचा वर्गवार अभ्यासक्रम, इयत्ता पहिली ते सहावीसाठी पाठ्यपुस्तकं आणि प्राशिक्षण साहित्य तयार करण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषा सक्तीने शिकविण्याच्या कायद्याचे पालन करण्यासाठी काही अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *