इरफान खानच्या स्मृतिर्थ या गावातील लोकांनी दिले हिरोची वाडी नाव

आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं नाव तयार करणाऱ्या इरफान खानचा मृत्यूने संपूर्ण जगाला हादरा बसला. इरफान खानने आपल्या अभिनयाने आपले अनेक चाहते निर्माण केले होते. तसेच त्याच्या सर्वांना मदत करण्याच्या वृत्तीने सर्वांच्या मनात त्याने जागा निर्माण केली होती. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या प्रेमापोटी आता राज्यातील इगतपूरी गावातील गावकऱ्यांनी त्याच्या नावावरून जागेचे नाव ठेवले आहे.

इरफान खानचे इगतपुरी गावकऱ्यांशी अगदी जवळचे संबंध होते. गावातील गरिबांच्या मदतीसाठी तो नेहमी समोर येत होता. इरफान खान गावात एक जागा देखील खरेदी केली होती. तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये एक नाते तयार झाले होते व गावाच्या विकासात इरफानने नेहमीच मदत केली. इरफान त्या भागात राहणाऱ्या मुलांसाठी पुस्तके, रेनकोट्स, स्वेटर्स आणि इतर आवश्यक वस्तू देखील देत असे. तो या गावकऱ्यांसोबत सण साजरा करत व त्यांना मिठाई देखील पाठवायचा.

त्यामुळेच इरफान खान याने खरेदी केलेल्या जागेला इगतपुरी येथील गाव हिरोची वाडी असे नाव देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *