विधान परिषदेची निवडणूक होणार बिनविरोध, काँग्रेस कडून माघार.

विधान परिषदेची  निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत होते मात्र काँग्रेस संख्याबळ नसतांना देखील दोन उमेदवार देण्यात आले होते. यामुळे आज दिवसभर महाविकास आघाडीत बैठका सुरू होत्या. ९ जागांसाठी १० उमेदवार दिल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून दिवसभर काँग्रेसची मनधरणी चालू होती. अखेर काँग्रेसने १ जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी ५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात आज मुंबईत तिन्ही पक्षाच्या नेत्यांची जवळपास तासभर बैठक चालली या बैठकीत हा निर्णय झाला.

येत्या 21 तारखेला विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार असून संख्याबळानुसार भाजप चार शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस दोन व काँग्रेस कडून एक उमेदवार देण्यात आला आहे. काँग्रेस ने दोन ऐवजी एक उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *