विधानपरिषद…! काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?

महाराष्ट्रात विधानसभेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून येत्या २१ तारखेला ही निवडणूक घेण्यात येणार आहे. विधानसभेची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे परंतु काँग्रेस ने दोन उमेदवार दिल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही. नऊ जागांसाठी १० उमेदवार राहिल्यास बिनविरोध होणे शक्य नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच जर काँग्रेसने दोन उमेदवार दिले तर आपण ही निवडणूक लढणार नाही. असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी काँग्रेसला दिल्याचे काही वाहिन्यांच्या वृत्तावरून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता काँग्रेस यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे असे मत व्यक्त केले. परंतु महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढण्यास महा विकास आघाडीच्या सहाही जागा जिंकून येईल असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सहा उमेदवार कसे निवडून आणता येईल याचे नियोजन करण्यात येत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची की निवडणूक घ्यायची याचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *