घरपोच दारू पोहचविण्यासाठी सांगलीतील एका संघटनेची तयारी, कोरोना रोखण्यासाठी घेतला पुढाकार

राज्यात सध्या कोणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे त्यातच सरकारने दारू विक्री चालू केली असून दारू घेण्यासाठी बियर बार समोर प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्ससींग चे तीन-तेरा वाजत आहे. म्हणून सांगलीतील एका संघटनेने गर्दी होऊ नये आणि कुणाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घरपोच दारू पोहोचविण्याची तयारी करण्याची तयारी दर्शवली आहे.
सांगली, मिरज, कुपवाड मनपा क्षेत्रात दीड महिन्यापासून घरपोच भाजीपाला पोचवणाऱ्या शहरातील जनसेवा फळे भाजीपाला विक्रेता संघटनेने यासाठी पुढाकारा घेतला आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तशी परवानगी द्यावी किंवा स्वतःच्या यंत्रणेमार्फत दारू घरपोच करावी, अशी मागणी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी केली आहे.

दारू खरेदीसाठी ज्याप्रमाणे सध्या बियर बार समोर तळीरामांची लाईन लागत आहे त्याच्यावरून सांगलीतील सांगलीत धोका वाढू शकतो यासाठी जनसेवा संघटनेने घरपोच पोहोचण्याची तयारी दर्शविली असून निस्वार्थ सेवा देण्यास त्यांनी आपली तयारी  दाखविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *