मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक, फडनवीस, राज ठाकरेसह १८ पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण.

राज्यातील सध्याची स्थिति पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून  या बैठकीला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सह राज्यातील १८ पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री सध्याची कोरोना संदर्भातली सरकारची तयारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या सूचना आणि अपेक्षित सहकार्य याविषयी चर्चा करणार आहेत. दुपारी दोन वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात येणार असून विविध पक्षाच्या नेत्यांसोबतच महाविकासआघाडीचे काही नेते यामध्ये असणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरत हे देखील उपस्थित राहणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीही सरकारला कोरोनाच्या संकट काळात काही सूचना केल्या होत्या तसेच त्यांचे मुख्यमंत्र्यांशी फोन वरून बोलणं झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होत. त्यामुळे आज राज ठाकरे आणि इतर पक्षातील नेते सरकारला काय सल्ला देतात याकडे लक्ष लागले आहे.  या बैठकीला शिवसेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस,भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,एमआयएम,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *