विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली…! JEE , NEET परीक्षांची तारीख जाहीर

देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने देशातील सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या त्यातच इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी होणारी JEE NEET परीक्षांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षांची तारीख जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. विकास निखरियाल निशंख यांनी JEE NEET परीक्षांची तारीख जाहीर केली असून JEE मेन्स १८ ते २३ जुलै ला होणार असून NEET परीक्षा २६ जुलैला होणार आहे.दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या यूजी कोर्ससाठी JEE आणि NEET ही परीक्षा देत असतात. परंतु देशात असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता मात्र ही परीक्षा घेण्याचे निर्णय घेतल्यामुळे बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ANI चे ट्वीट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *