तेलंगणात लॉकडाऊन २९ मे पर्यंत वाढवला, तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय.

कोरोनाच्या पार्श्भुमीवर देशात तिसरे लॉक डाऊन चालू आहे. परंतु कोरोनात विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणात लॉकडाऊन आता २९ मे पर्यंत राहणार असून २९ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविणारं तेलंगाना हे पहिले राज्य ठरले आहे. तसंच राज्यात संध्याकाळी ७ वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आलीय, अशी माहिती मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिली. तेलंगण सरकारच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारही लॉकडाऊन वाढवू शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना त्यासाठी आवश्यक दिशानिर्देशही जारी केले आहेत. नागरिकांनी संध्याकाळी ६ वाजेच्या आत आवश्यक साहित्य घ्यावे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करताना कुणी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशाराही राव यांनी दिला. तेलंगनामध्ये एकूण १०८५ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. तर २५ हून अधिक नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. महागड्या दारूवर १६ टक्के तर स्वस्त दारूवर ११ टक्के कर लावण्यात आला आहे. दारू दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास कारवाई होईल, असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *