चंद्रपुरकरांना दिलासा….! जिल्ह्यातील एकमेव रुग्णाच्या पत्नी व मुलीचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतांना देखील चंद्रपुरात कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नव्हता मात्र चंद्रपुरात दोन दिवसांपूर्वीच कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला होता. त्या रुग्णाच्या घरच्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील एकमेव रुग्णाच्या पत्नी व मुलीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे तर मुलाचा रिपोर्ट अजून यायचा असून त्याकडे सर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदर व्यक्ती राहत असलेला कृष्णनगर भाग व रात्रपाळी सुरक्षा रक्षक म्हणून हा कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत होता. त्या संपूर्ण इमारतीला देखील सील करण्यात आले आहे. तसेच कृष्णनगर वस्तीच्या आसपास असणाऱ्या इंदिरानगर, शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प परिसराला देखील बंद करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या परवानगी पासेस शिवाय कोणालाही या परिसरात खेळता येणार नाही. आरोग्य तपासणी व नोंदी घेणे सुरू असून याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा,अशी सूचना त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *