मोठी बातमी…! काश्मीरात चकमकीदरम्यान चार भारतीय जवान शहीद.

जम्मू काश्मीर येथील हंदवाडा परिसरात कल रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत भारताचे ४ जवान शहीद झाले असून त्यांच्या सोबत एका एका स्थानिक पोलिस दलातील कर्मचारी देखील शहीद झाला आहे. हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलांना यश आहे असून भारतीय जवानांमधील एक कमांडिंग ऑफिसर समवेत एक मेजर व दोन सैनिकांचा समावेश आहे.

दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी चार भारतीय जवान आणि एक स्थानिक पोलीस हंदवाडा येथील एका घरात शिरले. यावेळी त्यांचा इतरांशी संपर्क तुटला. त्यामुळे भारतीय जवान घरातच अडकून पडल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. यानंतर आज सकाळी हे चार जवान आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दहशदवाद्यांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन दहशदवाद्यांचा खतमा करण्यात आला असून ओलिस ठेवण्यात आलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अशी माहिती लष्करी अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *