मोठी बातमी….! चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव, कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.

राज्यात कोरोनाचा प्रसार होत असतांना आतापर्यंत ग्रीन झोन मध्ये असणाऱ्या चंद्रपूर मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून चंद्रपूर येथील कृष्णनगरातील ५० वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. सदर इसमाला इसोलेशन मध्ये ठेवण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हाती येत आहे. सदर व्यक्तीला दमा व खोकल्याचा त्रास होता असे सांगण्यात येत आहे. सदर व्यक्तीला कोरोनाची लागण कुठून झाली याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसून सदर व्यक्तीने बाहेर कुठे प्रवास केला काय? किंवा बाहेरून आलेल्या कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आला ? याबाबत माहिती अजून माहिती झाली नाही. त्याचे थ्रोट नागपूरला पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आता पाॅझीटीव्ह आला आहे.

चंद्रपूर प्रशासनाने गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्ह्या वर कमालीचे नियंत्रण ठेवले होते.आता मात्र चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *