महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर मार्फत मठ्ठा वाटप.

सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे आज महाराष्ट्र दोन व कामगार दिनाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरात मठ्ठा वाटप करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दोन हा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा अशी सूचना शासनाकडून देण्यात आली होती. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर मार्फत शहरातील तापमानाचा वाढता पारा पाहून शहरात  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलीस व आरोग्य सेवा देणाऱ्यांना मठ्ठा वाटप करण्यात आला. तसेच शहरातील फळे व भाजीपाला विक्रेत्यांना सुध्दा मठ्ठा वाटप करण्यात आला.

याप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र चे उपाध्यक्ष दिलीप रिंगणे, प्रशासक अधिकारी निमेश मानकर,  चंद्रपूर शहर अध्यक्ष प्रज्वल गर्गेलवार, शहर उपाध्यक्ष श्याम बोबडे, शुभम कोरम इत्यादी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

One Comment on “महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर मार्फत मठ्ठा वाटप.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *