मोठी बातमी….! देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढलं

देशातील लॉक डाऊन दोन आठवड्यांनी वाढविण्यात आल असून देशात लॉक डाऊन १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊन मध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात शक्यता असून रेड झोन मध्ये मात्र कोणतीही सुट देण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

देशात तिसऱ्या लॉकडाऊन ला ४ मे पासून सुरवात होणार असून १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून लॉकडाऊन वाढविण्यात आल आहे. या लॉकडाऊन दरम्यान रेल्वे, विमानसेवा, शाळा, सिनेमा हॉल, मॉल्स बंद राहणार आहे. तसेच तिसऱ्या लॉकडाऊन साठी केंद्र सरकार कडून नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये काय काय निर्बंध लागू करण्यात येईल याबाबत लवकरच माहिती मिळणार आहे. ४ मे नंतर काही सेवा टप्प्याटप्याने काही सेवा सुरू करण्यात येण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *