मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनावर, राज्यपालांशी चर्चा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असून त्यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राजभवनावर राजकीय चर्चा झाल्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या दोन्ही विधिमंडळातील सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे पूर्वी सदस्य होणे गरजेचे आहे. राज्यात सध्या आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवळणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. परंतु आता राज्यपाल यांनी निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. परंतु आज राज्यातील ९ विधानपरिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *